AI Summit मध्ये युथ काँग्रेसचे आंदोलन, टी-शर्ट काढून घोषणाबाजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीतील प्रगती मैदानावर असलेल्या भारत मंडपममध्ये आयोजित ‘एआय इम्पॅक्ट समिट’च्या (AI Impact Summit 2026) शेवटच्या दिवशी शुक्रवारी मोठा गोंधळ पाहायला मिळाला. येथे युथ काँग्रेसच्या (IYC) कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात तीव्र निदर्शने केली.

मिळालेल्या माहितीनुसार, एआय समिटचा आज पाचवा आणि शेवटचा दिवस होता. यावेळी देश-विदेशातील अनेक दिग्गज प्रतिनिधी उपस्थित असतानाच, दुपारी अचानक १० ते १२ युथ काँग्रेसचे कार्यकर्ते घोषणाबाजी करत हॉल क्रमांक ५ मध्ये आले. ‘PM is Compromised’ अशा आशयाचे फलक त्यांच्या हातात होते. यावेळी आंदोलकांनी अंगातील टी-शर्ट काढून शर्टलेस होत आपला निषेध नोंदवला.

युथ काँग्रेसने या आंदोलनाबाबत अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले आहे. “पंतप्रधान मोदींनी या एआय समिटमध्ये देशाची ओळख आणि डेटाचा व्यापार केला आहे,” असा आरोप कार्यकर्त्यांनी केला. हिंदुस्थान-अमेरिका व्यापार करार आणि डेटा सुरक्षिततेच्या मुद्द्यावरून हे आंदोलन करण्यात आल्याचे समजते.