पवना नदीत तरुण बुडाला, अल्पवयीन मुलाचा शोध सुरु

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sunk_drawn

पवना नदीवर पोहायला गेलेले दोघेजण पाण्यात बुडाले. यातील तरुणाचा मृतदेह हाती लागला तर दुसऱ्याच्या शोध सुरू आहे. बेबडओहोळ (ता. मावळ) येथे सकाळी साडे अकरा वाजता ही घटना घडली. संतोष ऊर्फ दादा बाळासाहेब घारे (वय 32, रा. जवळ, मुळशी) असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. तर आर्यन दीपक आलम (वय 13, रा. बेबडओहोळ) याचा रात्री उशीरापर्यंत शोध सुरू होता.

संतोष हा विवाहित असून एक दिवसापूर्वी तो बेबडओहोळ येथील आपल्या नातेवाईकांकडे आला होता. घरातील पाणी संपल्याने संतोष आणि आर्यन हे नातेवाईकांसह पवना नदीवर आंघोळीसाठी गेले होते. पोहोताना दोघेही पाण्यात बुडाले. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर शिवदुर्ग पथक लोणावळा आणि मारूंजी येथील पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण मंडळाचे अग्निशामक दल तसेच एनडीआरएफ पथकांनी दोघांचा शोध घेतला. त्यावेळी संतोषचा मृतदेह सापडला. मात्र, आर्यनचा शोध लागला नाही. रात्री उशीरापर्यंत हे शोधकार्य सुरु होते. तळेगाव दाभाडे पोलिस तपास करत आहेत.