तरुणाचा निर्घृण खून करून फोटो पत्नीला केले व्हॉट्स अ‍ॅप

प्रातिनिधिक फोटो

पहाटेच्या सुमारास अज्ञातांनी घरात घुसून तीक्ष्ण हत्याराने वार करून तरुण कामगाराचा खून केल्याची खळबळजनक घटना आज सायंकाळी रांजणगाव शेनपुंजी भागात उघडकीस आली.

murder

विशेष म्हणजे मारेकऱ्याने तरुणाचा खून त्याचे फोटो मयताच्या पत्नीच्या व्हॉट्स अ‍ॅपवर टाकल्याने सायंकाळी साडेपाच वाजता घटना उघडकीस आली. वाळुज औद्योगिक वसाहतीतील रांजणगाव शेनपुंजी परिसरातील मातोश्रीनगरात राहणारा भीमराव दिगंबर सावते (35) हा कंपनीतील कामगार असून, त्याच्याकडे आयशर वाहनदेखील आहे.

भीमराव हा मूळ नांदेड येथील राहणारा आहे. घरगुती कारणावरून पत्नीशी वाद झाल्याने ती पाच महिन्यांपासून माहेरी राहत होती. त्यामुळे भीमराव सावते हा घरात एकटाच राहत होता. मंगळवारी पहाटेच्या सुमारास मारेकऱ्यांनी घरात प्रवेश करून भीमराव याच्यावर तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करून निर्घृण केला.

सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास नातेवाइकांनी घटनेची माहिती एमआयडीसी वाळुज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांना दिली. यावरून सावंत यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली असता भीमराव हा रक्ताच्या थारोळयात पडलेला दिसला. या प्रकरणी एमआयडीसी वाळुज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मारेकरी ओळखीचेच…
मंगळवारी पहाटेच्या सुमारास मारेकऱ्यांनी भीमराव याचा निर्घृण खून केला. त्यानंतर मारेकऱ्यांनी त्याचे फोटो काढत त्याच्या पत्नीच्या व्हॉट्स अ‍ॅपवर पाठवले. पतीचा खून झाल्याचे लक्षात येताच तिने रांजणगावात राहणाऱ्या नातेवाइकांना घटनेची माहिती दिली. परिसरातील नागरीकांनी या बाबत बोलताना सांगितले कि, मयत भीमराव हा विकृत स्वभावाचा होता. येणाऱ्या जाणाऱ्या महिलांची तो नेहमी छेड काढत होता. त्यामुळे कंटाळून पत्नी माहेरी राहत होती. छेड काढल्याचा कारणावरूनच त्याचा खून करण्यात आला असावा, असे पोलिसांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या