म्हशीला वाचवण्यास गेलेल्या तरुणाचा गावतलावात बुडून मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील हिसोडा येथील 32 वर्षीय तरुणाचा म्हशीला वाचविताना गावलगत असलेल्या तलावात बुडून मृत्यू झाला. याप्रकरणी पारध पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मंगळवारी दुपारी 1.30 वाजता हिसोडा येथील अमोल सुदाम गोरे हा कोळीकोडा गावाजवळ आपले गुरे चारत असताना त्यांची म्हैस गावतलावात गेली. त्या म्हैशीला वाचवायला अमोल तलावात गेला आणि पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. त्याचे नातेवाईक सुनील आनंदा गोरे यांनी पारध ठाण्यात याबाबतची माहिती दिली. पारध पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलीस नाईक प्रकाश शिनकर, पो.काँ.सुरेश डुकरे यांनी घटनास्थळी जाऊन काही नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला. पुढील तपास पारध पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रदीप बाळे,प्रकाश शिनकर, सुरेश डुकरे करीत आहे.