तरुणाचा मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

आदिवासी आणि शेतकऱ्यांचा मोर्चा आझाद मैदानात असल्याने विधान भवन आणि मंत्रालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या कडक बंदोबस्तातही संतोष मोहिते हा तरुण मंत्रालयाच्या गेटसमोर आला. त्याने रॉकेलने भरलेले कॅन स्वतःच्या अंगावर रिकामे करण्याचा प्रयत्न केला.

नवी मुंबईतील एका बिल्डरने मोहिते याला 18 लाखांना फसवले आहे. यासंदर्भात मंत्रालयात वारंवार खेटे मारूनही ना या बिल्डरवर कारवाई ना कोणतीही नुकसानभरपाई. यामुळे कंटाळलेल्या संतोषने आत्महत्येचा निर्णय घेतला. मंत्रालयासमोर येऊन तो रॉकेल ओतण्याच्या तयारीत असतानाच सजग पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला.