आरक्षणावर आमचेही मत!

सामना प्रतिनिधी । मुंबई

आरक्षणाच्या मुद्दय़ावरून सध्या प्रचंड वादळ उठले आहे. भवताली घडणाऱया प्रत्येक घटनेवर तरुणाईला स्वतःचे विचार असतात. सतर्क जाणिवेतून त्यांची स्वतःची अशी ठाम मतं असतात. काय आहेत आजच्या तरुणाईचे आरक्षणाबाबत विचार…

आत्महत्या-हिंसक मार्ग हा पर्याय नाही
मला असं काटतं की, मराठा समाजालादेखील आरक्षण मिळालं पाहिजे, परंतु त्यांना इतर कोणत्याही जातीच्या आरक्षणाला धक्का न लागता स्कतंत्र आरक्षण देण्यात याके. मराठा समाजातदेखील बरीच अशी लोकसंख्या आहे की, जे अगोदरपासूनच गरीब आहेत. त्यांचा विकासही महत्त्वाचा आहे. तसेच सुप्रीम कोर्टाने जी आरक्षणाची मर्यादा ठरवली आहे ती रद्द करून जातवार जनगणना केली पाहिजे व तसे आरक्षण देण्यात यावे. मराठा समाजाने आपला लढा आत्महत्या क हिंसक कळणाने पुढे न नेता अहिंसेच्या मार्गाने पुढे नेला पाहिजे.
– मंजिरी धुरी, कीर्ती कॉलेज, दादर

प्रत्येकाला जातीचा अभिमान असतो
मला असे वाटते की, प्रत्येकाला आपल्या जातीचा अभिमान असतो आणि असायलाच हवा. तरी पण आरक्षण हे आपल्या आर्थिक निकषांवर असायला हवे. ज्यांना खरंच गरज आहे, जे अपंग आहेत, ज्यांना कोणाचा पाठिंबा नाही त्यांना नोकरी, शिक्षणासाठी संधी द्यायला हवी. जातीविषयक प्रत्येकाला अभिमान असतोच. पण त्यासाठी आपला असा निकष असायला हवा की, देशासाठी बलिदान दिले त्यांच्या कुटुंबीयांना मदत करणे गरजेचेच आहे. अशा काही गोष्टींमध्ये नियम असायला हवा. त्यांना खरोखरच गरज असते. हिंदुस्थानसाठी काहीतरी करताना ज्यांनी बलिदान दिलंय त्यांच्या कुटुंबीयांसाठी नक्की करावे. आर्थिक परिस्थिती कशी आहे तेही पाहिले पाहिजे.
– पूजा प्रसादे, सीएचएम कॉलेज, उल्हासनगर

विद्यार्थ्यांच्या हुशारीला प्राधान्य हवे
मला असे वाटते की, आपल्या देशाचा विकास हा जातीपातीवरच अडकून राहिला आहे. आरक्षणामुळे हुशार आणि कष्ट करणारी मुले मागे राहात आहेत. जाती-पातीच्या कॉलेजच्या लिस्ट लागण्यात अडथळा येतो आणि ओपन कास्टमध्ये असणाऱया मुलांसाठी टक्के चांगले असूनही हव्या त्या महाविद्यालयात प्रवेश घेता येत नाही. अशा प्रकारची आंदोलने होऊन जनजीवन विस्कळीत होते. अनेक प्रकारचे नुकसान झाल्याने त्याचा आपल्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. त्यामुळे विद्यार्थ्याच्या हुशारीवर त्याला प्रवेश मिळायला हवा.
– राज खाडे, कला-विद्या संकुल पॉलिटेक्निक, चर्नी रोड

सामान्य नागरिकांना वेठीस धरू नका
मराठा आरक्षण मोर्चामुळे मराठा समाजाचा फायदा होणार आहे म्हणून आरक्षण द्यायला हवे. सगळेच मराठा गर्भश्रीमंत नाहीत. प्रत्येक समाजात श्रीमंत-गरीब माणसे आहेत ना? जर एखादा मराठा मुलगा गरीब आहे, आयुष्यात पुढे जाण्यासाठी कष्ट करून चांगले मार्क्स मिळाल्यावरही त्याला जर हवे ते महाविद्यालय मिळणार नसेल तर त्याच्या हुशारीचा फायदा काहीच नाही असेच त्याला वाटेल. तिथे त्याचे खच्चीकरण होतंय. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या गुणकत्तेनुसार प्राधान्य दिले पहिजे.
– अदिती पालव, साठय़े कॉलेज, विलेपार्ले