
यूट्यूबने सोमवारी जाहीर केले की ते आपल्या प्लॅटफॉर्मवर हँडल आणत आहेत. कंपनीने सांगितले की निर्मात्यांना एक हँडल नाव निवडण्याचा पर्याय दिला जाईल आणि जेव्हा ते त्यांचे हँडल निवडू शकतील तेव्हा त्यांना नोटीफिकेशन जारी केले जाईल.
नवे बदल सहज व्हावेत यासाठी, कंपनीने म्हटले आहे की निर्मात्यांना हँडलचे हळूहळू रोलआउट केले जाईल. त्यांच्या हँडलचे नाव प्रथम कोणाला द्यायचे हे ठरवताना सबस्क्राइबरची संख्या, चॅनेलची अॅक्टिव्हिटी आणि YouTube वरील एकूण उपस्थिती यासारखे घटक विचारात घेतले जातील.
ज्या युझर्सकडे त्यांच्या चॅनेलसाठी वैयक्तिक URL आहेत, त्यांच्यासाठी एकतर URL हँडल म्हणून वापरण्याचा किंवा त्यांचा नंबर आला की तो बदलण्याचा पर्याय असेल.
कंपनीने असेही शेअर केले की जेव्हा युझर्स त्यांचे हँडल निवडतात तेव्हा त्यांच्याशी जुळणारे URL स्वयंचलितरित्या तयार केले जातील. तसेच प्लॅटफॉर्मवर युझर्सना नवीन हँडल-आधारित URL वर पुनर्निर्देशित केले जाईल.
‘आम्ही हे सांगू इच्छितो की क्रिएटर त्यांच्या हँडलवरून एक अद्वितीय ओळख निर्माण करू शकतील, आणि दर्शकांना विश्वास निर्माण होईल की ते त्यांच्या आवडत्या निर्मात्यांशी संवाद साधत आहेत’, कंपनीने ही माहिती ब्लॉगपोस्टमध्ये शेअर केली आहे.
























































