टिकटॉक, रिल्सला टक्कर देणार यू-टय़ूब शॉर्ट्स! क्रिएटर्सना मिळणार कमाईची संधी

शॉर्ट व्हिडिओ मेकिंग प्लॅटफॉर्मची सध्या चलती आहे. हिंदुस्थानात टिकटॉक बॅन झाल्यानंतर अनेक शॉर्ट व्हिडिओ मेकिंग अॅप  सध्या उपलब्ध झाले आहेत. याद्वारे कंटेट क्रिएटर्स चांगली कमाईदेखील करत आहेत. आता या स्पर्धेत यू-टय़ूबनेदेखील उडी घेतली आहे. यू-टय़ूबचे शॉर्ट्स आता पंटेंट क्रिएटर्सना भरघोस कमाई करण्याची संधी देणार आहेत. अधिकाधिक क्रिएटर्सना आपल्या प्लॅटफॉर्मकडे आकर्षित करण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे.

नुकताच कंपनीने 100 मिलियन डॉलर्सचा फंड जाहीर केला आहे. कंटेंट क्रिएटर्स आपल्या प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ अपलोड करून 7400 रुपयांपासून ते  साडेसात लाख रुपयांपर्यंतची कमाई करू शकतात, अशी माहिती पंपनीने दिली आहे. अर्थातच ही कमाई व्हिडिओला मिळणाऱया ह्यूजच्या आधारावर अवलंबून असणार आहे. यू-टय़ूब शॉर्ट्सची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असून या अॅपवर दिवसाला शॉर्ट व्हिडिओज पाहणाऱयांची संख्या 15 बिलियनच्या घरात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या