
सामना ऑनलाईन । हैदराबाद
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी 20 राज्यातील 91 मतदारसंघात मतदान प्रक्रिया सुरू आहे. सर्वत्र शांततेत मतदान होत असले तरी आंध्र प्रदेशात याला गालबोट लावणारी घटना घडली आहे. आंध्र प्रदेशातील नरसरावपेट मतदारसंघात तेलगू देशम पक्ष आणि वायएसआरसीपी पक्षाच्या कार्यकर्तांमध्ये मतदान केंद्रातच तुफान हाणामारी झाली. केंद्रावर तैनात सुरक्षा रक्षकांनी बळाचा वापर करत कार्यंकर्त्यांना पांगवले. पुतलपट्टूमध्ये झालेल्या दोन्ही पक्षांच्या हाणामारीत दोन जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. नरसरावपेटमध्ये झालेल्या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.
#WATCH: Clash broke out between YSRCP and TDP workers in Puthalapattu Constituency in Bandarlapalli, Andhra Pradesh. Police resorted to lathi-charge pic.twitter.com/q7vxRIR0R8
— ANI (@ANI) April 11, 2019
नरसरावपेट लोकसभा मतदारसंघात टीडीपीचा खासदार आहे. 2014 च्या निवडणुकीत टीडीपीच्या आर.एस राव यांनी आयएसआरसीपीच्या के.आर. रेड्डी अल्ला यांना 30 हजारपेक्षा जास्त मतांनी पराभूत केले होते. त्यामुळे या मतदारसंघातील लढत दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या व्हिडीयोत दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते जुंपलेले दिसत आहेत. कार्यंकर्त्यांना पांगवण्यासाठी सुरक्षा रक्षक लाठीमारही करत आहे. मात्र, संतप्त कार्यकर्ते सुरक्षा रक्षकांना न जुमानता लाथाबुक्क्यांनी हाणामारी करत खुर्च्या, टेबलसह हातात येईल ती वस्तू फेकत आहेत. या मतदारसंघातील 214,215 आणि 216 या मतदान केंद्रावर हाणामारी झाली आहे. तसेच या केंद्रांमध्ये सकाळी 9.30 वाजेपर्यंत मतदान सुरू झाले नसल्याने अनेक मतदार मतदान न करताच परतले. त्यामुळे या मतदान केंद्रांमध्ये पुन्हा मतदान घेण्याची मागणी टीडीपीने केली आहे.
TDP leader S Bhaskar Reddy killed in clashes in Tadipatri town of Anantapur. TDP has alleged that YSRCP workers are behind the incident. #AndhraPradeshElection2019 #IndiaElections2019
— ANI (@ANI) April 11, 2019
























































