मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी युसूफ मेमनचा मृत्यू

गेल्या दोन वर्षांपासून नाशिक मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या 1993 मधील मुंबईच्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी युसुफ अब्दुल रज्जाक मेमन याचा शुक्रवारी सकाळी हृदयविकाराने मृत्यू झाला.

यूसुफ मेमन (55) हा 2018 पासून नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. तो सकाळी साडेनऊ वाजता कारागृहाच्या प्रसाधनगृहात चक्कर येऊन पडला. तेथील कर्मचाऱयांनी त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱयांनी त्याला तपासून मृत घोषित केले. सरकारवाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या