कोल्हापुरात युवासेनेकडून खासगी वाहन ॲम्बुलन्स म्हणून पालिकेकडे सुपुर्द

418

कोरोना संसर्गांमुळे जिल्ह्यात उद्भवलेल्या आपत्तीजन्य परिस्थितीत प्रशासकीय यंत्रणा तोकडी पडत आहे.  अत्यवस्थ रुग्णांना वेळेत उपचारास दाखल करण्यासाठी ॲम्बुलन्स सेवेतही अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे युवासेनेचे पदाधिकारी हर्षल सुर्वे यांनी स्वतःचे चारचाकी वाहन ॲम्ब्युलन्स म्हणुन व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे यांच्याकडे महानगरपालिका आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते सुपुर्द केले.

यासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या घेण्यात आल्या असुन शहराबाहेरीलही अत्यावश्यक पेशंटसाठी मोफत ॲम्बुलन्सची सुविधा देण्यात करण्यात येणार आहे. गरजुंनी  व्हाईट आर्मीच्या 9272090909 या हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या