4 जुलै रोजी ऑनलाइन पद्धतीने होणाऱया व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीला युवासेनेने विरोध केला आहे. ही बैठक प्रत्यक्ष घेण्याची मागणी युवासेनेच्या वतीने मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांच्याकडे करण्यात आली आहे.
व्यवस्थापन परिषद सदस्यांना ई-मेलद्वारे व्यवस्थापन परिषद बैठक 4 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजता ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याचे कळविण्यात आले. वास्तविक सध्या कोविडसदृश अथवा नैसर्गिक आपत्तीसारखी कोणतीही परिस्थिती नसताना आभासी पद्धतीने सभा घेणे योग्य नसल्याचे युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर यांनी स्पष्ट केले. ऑनलाइन बैठकीत बरेच व्यत्यय येतात. त्यामुळे बैठकीत घेतलेले निर्णय पूर्णपणे सर्व सदस्यांना कळत नाहीत. त्यामुळे ही बैठक प्रत्यक्षात घेण्याची मागणी युवासेनेच्या वतीने करण्यात आली आहे.


























































