युवासेना विभाग युवा अधिकारी जाहीर

784

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील दिंडोशी, अंधेरी (पश्चिम), वरळी विधानसभेतील युवासेना विभाग युवा अधिकाऱयांच्या नियुक्त्या केल्या आहेत. प्रशांत मानकर यांची दिंडोशी विभाग युवा अधिकारी, रमेश वांजळे अंधेरी पश्चिम तर संकेत सावंत यांची वरळी विभाग युवा अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपात असून सहा महिन्यांनी पदाधिकाऱयांचे काम बघून कायम करण्यात येतील, असे युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून जाहीर करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या