युवासेना सोशल मीडिया समन्वयक जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी युवासेना सोशल मीडिया समन्वयवादी नियुक्त्या केल्या आहेत. सदर नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱयांचे काम बघून कायम करण्यात येतील अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

सोशल मीडिया समन्वयक – प्रमोद भडसाळे (मलबार हिल विधानसभा), संजय पाटणकर (चेंबूर विधानसभा), दक्षता ठाकूर (मुलुंड विधानसभा), यश मोरे (कलिना विधानसभा), ओंकार कांबळे (बोरिवली विधानसभा), प्रजय राऊत (चांदिवली विधानसभा), अभिजित दळवी (वर्सोवा विधानसभा), प्रशांत शिवेकर (वर्सोवा विधानसभा), दीपेश पोकळे (दिंडोशी विधानसभा), संदेश निकम (दिंडोशी विधानसभा).