युवीचा ‘हा’ फोटो पाहून सानिया मिर्झानेही केले ट्रोल, म्हणाली …

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंह (Yuvraj Singh) सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. नुकताच त्याने आपला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. हा फोटो शेअर केल्यानंतर त्याच्यावर ट्रोलर्सची धाड पडली. विशेष म्हणजे या ट्रोलर्समध्ये हिंदुस्थानची आघाडीची टेनिस खेळाडू सानिया मिर्झा (Sania Mirza) हिचेही नाव आहे. युवराजच्या फोटोवर सानिया मिर्झानेही भन्नाट उत्तर दिले आहे.

युवराज सिंहने आपला नवीन लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोमध्ये युवराजने क्लिन शेव्ह केल्याचे दिसत आहे. ‘नवीन लूक, चिकना चमेला!! की पुन्हा दाढी वाढवायला हवी’, असे कॅप्शन युवीने आपल्या या फोटोला दिले आहे. हा फोटो शेअर करताच युवीवर नेटकरी तुटून पडले. सानिया मिर्झा हिलाही युवीचा नवा लूक आवडला नाही. सानियाने युवीची खिल्ली उडवत त्याला, ‘तोंड वेडावून काय लपवत आहेत? दाढी वाढव’, असा सल्ला तिने युवीला दिला आहे.


View this post on Instagram

New look chikna chamela !!or should I bring back the beard ?

A post shared by Yuvraj Singh (@yuvisofficial) on

आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम
304 एक दिवसीय लढती, 58 टी-20 आणि 40 कसोटी सामन्यांनंतर युवराजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. दोन महिन्यांपूर्वी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. यानंतर नुकत्यात एका मुलाखतीमध्ये त्याने 2015 चा विश्वचषक खेळण्याची इच्छा होती, असे म्हटले. परंतु त्याला 2015 आणि 2019 मधील विश्वचषकामध्ये संधी मिळाली नव्हती. यानंतर त्याने अखेर निवृत्तीची घोषणा केली.