पैशाने क्लास येत नाही, नेटकऱ्यांनी हार्दीक पंड्याला धुतले

1296

क्रिकेटपटू हार्दीक पंड्या हा कायम वादात राहिला आहे. काही दिवसांपूर्वी ‘कॉफी विथ करण जोहर’ या कार्यक्रमात महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्ये केल्याप्रकरणी पंड्याला निलंबित केले होते. त्यानंतर पंड्यावर नेटकऱ्यांनी जबरदस्त टीका केली होती. त्यामुळे त्याने सोशल मीडियावरून सर्वांची माफी देखील मागितली होती.

बेताल वक्तव्यामुळे घडलेल्या या प्रकरणातून अद्याप पंड्याने धडा घेतलेला दिसत नाही. पंड्याने पुन्हा एकदा सोशल मीडियावर वाद निर्माण केला असून नेटकऱी त्याला ट्रोल करत आहेत. पंड्याने माजी गोलंदाज झहिर खान याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतानाच ट्रोल केले आहे. आयपीएलमध्ये खेळताना पंड्याने झहिरच्या चेंडूनवर षटकार मारला होता. त्या षटकाराचा व्हिडीओ पोस्ट करत त्याने झहीरला खिजवण्याचा प्रयत्न केला. मात्र झहीरच्या वाढदिवशी पंड्याने केलेल्या या प्रकाराने नेटकरी संतापले असून त्यांनी पंड्याला ट्रोल केले आहे.

पंड्याकडे खेळातून पैसा जरी आला असेल तरी पैशाने क्लास येत नाही हे आज त्याने सिद्ध केले आहे, अशी टीका नेटकऱ्यांनी केली आहे. काहींनी त्याला झहीर हा वरिष्ठ खेळाडू असून त्याच्याशी असे बोलणे चुकीचे असल्याचा सल्ला देखील त्याला दिला आहे. तर काहींनी पंड्याला गर्व चढला असल्याची टीका देखील केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या