
Zomato चे सीईओ दीपिंदर गोयल यांनी बुधवारी जाहीर केलं आहे की, फूड डिलिव्हरी करणारे सर्व रायडर्स यापुढे नेहमीचे लाल रंगाचे टी-शर्ट वापरतील’. ‘ऑल-व्हेज’ या नावाखाली त्यांनी रायडर्ससाठी नव्याने लागू केलेला हिरव्या रंगाचा ड्रेसकोड आता मागे घेण्यात आला आहे. हिरव्या रंगाच्या ड्रेसकोडवरून मोठा वाद निर्माण झाला होता. आता मात्र हा ड्रेसकोड वगळल्यानंतर वादाला पूर्णविराम मिळाला आहे.
‘आम्ही शाकाहारी लोकांच्या सेवेसाठी एक नविन पथक सुरू केलं ते तसंच कार्यरत राहणार आहे. मात्र त्यांच्यासाठीचे हिरव्या रंगाचा ड्रेसकोड निश्चित करण्यात केला होता तो ड्रेसकोड आम्ही रद्द करत आहोत. आमचे सर्व रायडर्स – आधीपासून निश्चित करण्यात आलेला लाल रंगाचाच ड्रेसकोड वापरतील’, असं गोयल यांनी X वरील एका पोस्टमध्ये म्हटलं आहे.
Update on our pure veg fleet —
While we are going to continue to have a fleet for vegetarians, we have decided to remove the on-ground segregation of this fleet on the ground using the colour green. All our riders — both our regular fleet, and our fleet for vegetarians, will…
— Deepinder Goyal (@deepigoyal) March 20, 2024
‘याचा अर्थ असा आहे की, शाकाहारी ऑर्डरसाठी असलेला रायडर्स देखील आता लाल रंगाच्या ड्रेसकोडमध्ये दिसेल. मात्र ते फक्त शाकाहारी अन्नच पोहोचवतील. मांसाहाराशी संबंधित, आणि कोणत्याही विशेष दिवसांमध्ये कोणत्याही सोसायट्यांद्वारे रायडर्सना रोखलं जातं. तेव्हा आमच्या रायडरची सुरक्षितता आमच्यासाठी सर्वात महत्वाची आहे’, असं ते पुढे म्हणाले.
दीपंदर गोयल यांनी आपल्या ट्विटमध्ये असेही म्हटलं आहे की, कंपनीच्या लक्षात आले की ‘आमचे काही ग्राहकही त्यांच्या घरमालकांसोबतच्या वादामुळे अडचणीत येऊ शकतात आणि आमच्यामुळे असं घडल्यास ते चांगलं होणार नाही’.

























































