झूम अॅप असुरक्षित, प्रत्येक वेळी नवीन युजर आयडी आणि पासवर्ड घ्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता हिंदुस्थानात लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. या काळात अनेकांकडून एकमेकांशी संवाद साधण्यासाठी गुगलच्या झूम ऍपचा वापर तुमच्यापैकी अनेकजण करत असाल, तर तो जपून करा. कारण हा ऍप सुरक्षित नसल्याचा इशारा केंद्रीय गृहमंत्रालयाने दिला आहे. या ऍपचा वापर करण्यासाठी गृहमंत्रालयाने नवी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. यानुसार या ऍपचा वापर करताना प्रत्येकवेळी नवीन युजर आयडी आणि पासवर्ड घ्यावा, अशी ताकीद गृहमंत्रालयाने दिली आहे.

कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता देशभरात सध्या 3 मेपर्यंत लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. परिणामी एकमेकांशी तुटलेला संपर्क जोडण्यासाठी अनेकांनी गुगलच्या झूम या ऍपची मदत घेतली आहे. ऑनलाईन अभ्यासासाठी, मित्रमैत्रिणींशी संवाद साधण्यासाठी असो किंवा वर्क फ्रॉम होम करीत असलेल्यांना मीटिंगसाठी या ऍपच वापर केला जात आहे. त्यामुळे अल्पावधीत या ऍपचा वापर वाढला आहे. त्यामुळे एकमेकांशी संवादासाठी व्हिडीओच्या माध्यमातून झूम ऍप हे प्रभावी माध्यम ठरत आहे. मात्र हे ऍप सुरक्षित नसल्याचे आज केंद्रीय गृहमंत्रालयाने जाहीर केले आहे. त्यामुळे याच्या वापरासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली आहेत. या अगोदरही केंद्रीय गृहमंत्रालयाने 6 फेब्रुवारी रोजी यासंदर्भातील माहिती दिली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून याचा वापर वाढल्याने गृहमंत्रालयाने नव्याने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत.

या मार्गदर्शक तत्त्वानुसार या ऍपचा वापर कसा करायचा याची माहिती
– प्रत्येकवेळी नव्याने युजर आयडी आणि पासवर्ड वापरावा. त्याचप्रमाणे कॉन्फरन्स कॉलचा वापर करताना तो अतिशय काळजीने करावा.
– त्यामध्ये कोणालाही सहभागी करुन घेताना तो काळजीपूर्वक करण्याची सूचना करण्यात आली आहे.
– त्याचप्रमाणे वेटिंग रुम हा पर्याय अनेबल करून ठेवावे, जेणेकरून जेव्हा कॉन्फरन्स कॉल करणारा व्यक्ती परवानगी देईल त्याचवेळी इतर व्यक्ती त्यात सहभागी होऊ शकतो.
– याशिवाय स्क्रिन शेअरिंग हा पर्याय फक्त कॉल करणाऱया होस्टकडेच असावेत.
– याबरोबरच कोणालाही रिजॉईन करता येऊ नये म्हणून तो पर्याय बंद ठेवावा.
– महत्वाचे म्हणजे बंद फाईल ट्रान्सफरचा पर्यायच वापर कमीत कमी वेळा करावा, अशी सक्त ताकीद केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली आहे.
– सध्या वाढत असलेल्या झूम ऍपचा वाढता वापर लक्षात घेऊनच ही मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आल्याचे यावेळी गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे.