‘एसआरए’, ‘म्हाडा’ने बांधलेल्या 65 इमारतींत भरणार पालिकेच्या शाळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘एसआरए’ व ‘म्हाडा’ने आरक्षित भूखंडावर बांधलेल्या 65 इमारतींत पालिका शाळांचे वर्ग भरणार आहेत. यातील 8 इमारतींचा ताबा पालिकेला मिळाला असून त्यात शाळाही सुरू झाल्या आहेत. उर्वरित इमारतींचा ताबा प्रक्रिया सुरू असून टप्प्याटप्प्याने या इमारतींतही शाळा सुरू केल्या जाणार असल्याची माहिती पालिकेचे शिक्षण सहआयुक्त अजित पुंभार यांनी दिली.
पालिकेच्या माध्यमातून केल्या जाणाऱया उपाययोजनामुळे विद्यार्थीसंख्या वाढत आहे. त्यामुळे पालिकेला वाढीव वर्गखोल्यांची गरज भासणार आहे. यासाठी मुंबई शहर व उपनगरांतील काही आरक्षित भूखंडांवर म्हाडा व एसआरएने बांधलेल्या इमारती पालिकेला शाळांसाठी हस्तांतरित केल्या जाणार आहेत. परवानग्या व इतर कारणांमुळे या इमारतींचा ताबा मागील काही वर्षे रखडला होता; मात्र आता या प्रक्रियेला वेग आला आहे. शहर, पूर्व उपनगर व पश्चिम उपनगर परिसरात एकूण 65 इमारती बांधून तयार आहेत. नियम 33/7 व 33/10 अंतर्गत पालिकेच्या शिक्षण विभागाला या इमारती मिळणार आहेत. तीन ते सात मजली असलेल्या या इमारतींच्या सर्व मजल्यांवर पालिकेच्या शाळा भरणार आहेत. यातील 8 इमारतींचा ताबा पालिकेला मिळाला असून त्यात वर्गही सुरु झाले आहेत. तर शिल्लक इमारती पालिकेच्या ताब्यात मिळाल्यानंतर आवश्यक सुविधा निर्माण केल्या जातील आणि हे वर्ग विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध केले जातील असे असे पुंभार यांनी सांगितले.
या इमारतींत भरतात वर्ग –
1) नवाब टँक तामिळ महानगरपालिका शाळा
(विद्यार्थी संख्या-380)
2) माझगाव उर्दू महानगरपालिका शाळा
(विद्यार्थी संख्या-578)
3) वाडीबंदर उर्दू महानगरपालिका शाळा
(विद्यार्थी संख्या-161)
4) चिंचपोकळी मराठी महानगरपालिका शाळा
(शाळा सुरू आहे)
5) सावरपाडा महानगरपालिका शाळा
(विद्यार्थी संख्या-515)
6) सुमेर नगर महानगरपालिका शाळा
(विद्यार्थी संख्या-537)
7) आदर्शनगर महानगरपालिका शाळा तळमजला (विद्यार्थी संख्या-365)
8) एमपीएस परेरावाडी शाळा (शाळा सुरू आहे)
या ठिकाणी आहेत इमारती
मुंबई शहर – 18
पूर्व उपनगर – 26
पश्चिम उपनगर – 21

स्वच्छ सागर, सुरक्षित सागर अभियानांतर्गत रविवारी सकाळी जुहू समुद्र किनाऱयावर स्वच्छता अभियान राबवण्यात आले. युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅम अंतर्गत या अभियानामध्ये के. सी. महाविद्यालयाच्या 100 हून अधिक तरुणांनी सहभागी होत जुहू समुद्र किनारा साफ केला.