
रात्री उशीरा घरी आलेल्या बॉयफ्रेंडसाठी जेवण बनवायला नकार दिला म्हणून त्याने त्याच्या गर्लफ्रेंडला बेदम मारहाण केली आहे. तेजल ठाकोर असे त्या तरुणीचे नाव असून तिने तिचा बॉयफ्रेंड अजय ठाकोर याच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
अजय व तेजल यांचे लग्न झालेले नसून ते दोघे एकाच घरात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतातय सोमवारी अजय उशीरा रात्री घरी आला व त्यानंतर त्याने तेजलला जेवण वाढायला सांगितले. मात्र घरात काहीच बनवलेले नसल्याचे तिने सांगितले. त्यावर त्याने तिला काहीतरी बनव असे सांगितले. तिने त्याला नकार दिला. त्यामुळे अजय चिडला व त्याने तेजलला बेदम मारहाण केली. घरातील टेबल फॅन देखील तिच्या डोक्यात मारला. त्यानंतर तो घरातून निघून गेला.
अजय निघून गेल्यावर भेदरलेल्या अवस्थेत तेजल तिच्या आई वडिलांकडे गेली. तिला झालेल्या जखमा पाहून त्यांना देखील धक्का बसला. त्यांनी तिला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांना नारोडा पोलीस ठाण्यात अजय विरोधात तक्रार दाखल केली.




























































