घरखरेदीसाठी पुन्हा सुवर्णसंधी; शून्य मुद्रांक शुल्क योजनेत 31 डिसेंबरपर्यंत वाढ

घर खरेदी करण्याची ईच्छा असलेल्यांसाठी आता आणखी एक सुवर्णसंधी आहे. बांधकाम व्यावसायिकांची संघटना असलेल्या नरेडकोने महाराष्ट्रच्यावतीने शून्य मुद्रांक शुल्काची योजना आता 31 डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील 1 हजाराहून अधिक नरेडको सदस्यांच्या प्रकल्पाचा यात समावेश आहे.

महत्त्वाचे म्हणजे मुद्रांक शुल्क माफ केल्यामुळे ऑगस्ट ते ऑक्टोबरमध्ये मुंबईतील निवासी घरांच्या विक्रीत 300 टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती नरेडकोने दिली आहेकोरोनाचा मोठा फटका रियल इस्टेट क्षेत्राला देखील बसला आहे. त्यामुळे रियल इस्टेट क्षेत्राला गती देण्यासाठी राज्य सरकारने 31 डिसेंबरपर्यंत मुद्रांक शुल्कात 3 टक्के कपात केली आहे. या निर्णयानंतर नरेडकोने 31 ऑक्टोबरपर्यंत शून्य मुद्रांक शुल्क योजना जाहीर केली होती. या योजनेला आता ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने घरखरेदीला चालना देण्यासाठी ही योजना आता 31 डिसेंबपर्यंत राबवण्याचा निर्णय नरेडकोने घेतला आहे.याशिवाय रियल इस्टेटमधील गुंतवणूकीला चालना देण्यासाठी 25 ते 27 नोव्हेंबरलारियल इस्टेट अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर समिटचे आयोजन देखील केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या