गडचिरोलीत सीआरपीएफच्या 11 जवानांसह 3 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह

गडचिरोली जिल्ह्यातील कृषी महाविद्यालयात विलगीकरणात असलेल्या सीआरपीएफ बटालियन 113 मधील 9, अहेरी सीआरपीएफमधील 2, अहेरी येथीलच विलगीकरणात असलेला एकजण आणि गडचिरोलीमधील दोन अशा एकूण 14 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अॅक्टिव्ह कोरोनाबाधितांची संख्या 74 झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 63 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 138 झाली आहे. गडचिरोलीत असलेल्या एकूण 83 रुग्णांवर वेगवेगळ्या ठिकाणी उपचार सुरु आहेत. यामध्ये 9 जण जिल्ह्याबाहेरील आहेत.

अहेरी येथील इतर नागरिकांमधील एकजण विलगीकरण कक्षात होता. त्याचे वय 32 वर्षे असून नांदेडहून नोकरीत रुजू होण्यासाठी आला आहे. तसेच गडचिरोली येथील इतर 2 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये गुजरात इथून परतलेली 65 वर्षीय महिला व मुंबईहून परतलेला 27 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. दोघांनाही गडचिरोली येथे समाज कल्याणच्या होस्टेलमध्ये विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते.

आपली प्रतिक्रिया द्या