
सामना ऑनलाईन, जळगांव
महापौर ललित कोल्हे यांच्यासह मनसेचे बारा नगरसेवक खान्देश विकास आघाडीतर्फे मनपाची निवडणूक लढविणार आहेत. आमचे नेते सुरेशदादा जैन हे आहेत. त्यांच्या नेतृत्वावर आम्हाला विश्वास असून पुढील निवडणूक लढविणार आहोत, असे महापौर ललित कोल्हे यांनी जाहीर केले आहे.
जळगाव महापलिकेची निवडणूक जाहीर झाली असून १ ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. आज मनसेचे ललित कोल्हे व त्यांच्या समर्थक नगरसेवकांनी मनपाची निवडणूक खान्देश विकास आघाडीतर्फे लढविणार असल्याचे सांगितले. खान्देश विकास आघाडीचे नेते तथा शिवसेनेचे माजी आमदार सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वावर आमचा विश्वास असून पुढील वाटचाल त्यांच्या मार्गदर्शनाखाली करणार असल्याचे महापौर कोल्हे यांनी सांगितले.



























































