दूरदर्शनच्या 12 कर्मचाऱ्य़ांना अटक, पगार आणि अन्य सुविधांची मागणी करीत अधिकाऱ्य़ाला धकाबुक्की

पगार आणि अन्य सुविधा मिळाव्यात, अशी मागणी करीत दूरदर्शनच्या 30 कर्मचाऱ्य़ांनी सहायक संचालकाच्या खोलीत घुसून त्यांना घेराव घालत धक्काबुक्की केल्याची घटना शनिवारी घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करून वरळी पोलिसांनी 12 कर्मचाऱ्य़ांना अटक केली, तर 15 जणांवर गुन्हा दाखल केला. दूरदर्शनचे 30 कर्मचारी शनिवारी त्यांच्या सहायक संचालकांच्या खोलीत घुसले आणि त्यांनी अधिकाऱ्य़ाशी हुज्जत घालण्यास सुरुवात करीत धक्काबुक्की केली. कर्मचाऱ्य़ांनी कार्यालयातील सामानाचीदेखील फेकाफेक केली, असे अधिकाऱ्य़ाने दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे. दरम्यान, आम्हाला चांगला पगार व अन्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी आमची मागणी असल्याचे कर्मचाऱ्य़ांचे म्हणणे आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करून 1२ कर्मचाऱ्य़ांना अटक केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या