
राज्यातील साखर कामगारांना 12 टक्के पगारवाढ मिळणार आहे. त्याबाबतचा करार साखर कारखान्यांचे व्यवस्थापन प्रतिनिधी, साखर कारखाना कामगार प्रतिनिधी आणि शासन प्रतिनिधी यांच्या समितीने केला आहे. त्यानुसार मूळ वेतनात 12 टक्क्यांची वाढ होणार असून महागाई भत्त्यात 2.70वरून 2.90 टक्के एवढी वाढ करण्यात आली आहे. राज्यातील साखर कारखाना कामगारांच्या पंचवार्षिक वेतन कराराची मुदत मार्च 2019मध्ये संपुष्टात आल्याने राज्य सहकारी साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली नवीन वेतन करारासाठी समिती नेमण्यात आली होती. त्यानुसार 12 टक्के पगारवाढ देण्याचा निर्णय झाला असल्याचे महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाने स्पष्ट केले आहे.



























































