जम्मू कश्मीरमध्ये देशविरोधी घोषणा देणाऱ्या 13 जणांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू काश्मीर मधील जामा मशिदीबाहेर शुक्रवारची नमाज अदा केल्या नंतर काही समाजकंटकांनी देशविरोधी घोषणा दिल्या. या प्रकरणी पोलिसांनी 13 जणांना अटक केली असून त्यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

रमजानच्या महिना सुरू असल्याने जामा मशिदीत जुम्याची नमाज अदा करायला बऱ्याच जणांनी गर्दी केली होती. नमाज झाल्यानंतर काही जणांनी मशिदीत देशविरोधी घोषणा द्यायला सुरुवात केली. मशिदी मधील कर्मचाऱ्यांनी त्यांना मशिदी बाहेर काढले. त्यावरून त्यांच्यात हाणामारी झाली. मात्र ते समाज कंटक तेवढ्यावर थांबले नाहीत. त्यांनी मशिदी बाहेर देखील घोषणा दिल्या.

बशरत नबी भट व बहुदद्दीन साब या दोन मुख्य आरोपीना सर्व प्रथम पोलिसांनी अटक केली नंतर आणखी 11 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.