13 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने प्रशासनात फेरबदल करण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी सात सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यानंतर शुक्रवारी आणखी 13 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. संभाजीनगरचे विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांची बदली पुण्यात क्रीडा आणि युवक कल्याण आयक्त म्हणून करण्यात आली आहे. तर भापकर यांच्या जागी क्रीडा, युवक कल्याण आयुक्त सुनील केंद्रेकर यांची नेमणूक झाली आहे.

ठाणे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अभियंता विवेक भीमनवार यांची बदली वर्धा जिल्हाधिकारीपदी झाली आहे. तर आपत्ती व्यवस्थापनाचे संचालक डी. बी. देसाई यांची बदली कोल्हापूरचे जिल्हाधिकारी म्हणून झाली आहे. पशुसंवर्धन आयुक्त कांतीलाल उमाप यांची बदली मेडाचे महाव्यवस्थापक म्हणून झाली आहे. तर जी. बी. पाटील यांना मंत्रालयात कृषी, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागात नियुक्ती देण्यात आली आहे.

दली झालेले अधिकारी; कंसात नवी नियुक्ती 
एच. मोडक (जिल्हाधिकारी वाशीम), शैलेश नवल (जिल्हाधिकारी अमरावती), अविनाश ढाकणे (जिल्हाधिकारी जळगाव), लक्ष्मीनारायण मिश्रा ( आयुक्त पशुसंवर्धन), विनय गौडा जी. सी. (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नंदुरबार), आयुष प्रसाद (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अकोला), जीतेंद्र दुदी (सहाय्यक जिल्हाधिकारी, नंदुरबार).