
मुंबईत एक धक्कादाय घटना घडली आहे. एका 13 वर्षाच्या मुलाने 12 वर्षाच्या मुलाचे लैंगिक शोषण केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला पकडले आहे.
मालाडमध्ये एक 12 वर्षाचा मुलगा शाळेत जात होता. तेव्हा एका अनोळखी मुलाने त्याला जवळ बोलावले. त्याच्याशी मैत्रीपूर्ण संवाद साधला आणि जवळच्या एका गार्डनमध्ये घेऊन गेला. गार्डनमध्ये त्याने या मुलावर लैंगिक अत्याचा केले. पीडित मुलगा जेव्हा घरी पोहोचला तेव्हा त्याने सर्व हकीगत आपल्या पालकांना सांगितले. पालकांनी लगेच पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. पीडित मुलाने आरोपीचे वर्णन केले. पोलिसांनी आरोपीला पकडून त्याची रवानगी डोंगरीच्या बालसुधारगृहात केली आहे.

























































