
राज्यातील सहकार चळवळ आर्थिकदृष्टय़ा मजबूत करण्यासाठी राज्य सरकारने आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे सक्षमीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्हा बँकांना आर्थिक सहाय्य म्हणून 130 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार असून त्यापैकी 78 कोटी रुपयांचा पहिला हप्ता वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. सरकारच्या या आर्थिक मदतीमुळे जिल्हा बँकांना मोठा दिलासा मिळू शकणार आहे.





























































