
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांना न्यायालयाने आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. चौकशीसाठी त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ही कोठडी 29 एप्रिलपर्यंत असेल. या प्रकरणातील इतर आरोपींनाही न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
देशमुख यांच्यावर मनी लॉडरिंग आणि 100 कोटींच्या वसुलीप्रकरणाचे आरोप आहेत. त्यांच्या सांगण्यावरून हा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. देशमुख यांना न्यायालयीन कोठडी मिळाल्याने त्यांचे वकील आता देशमुख यांच्या जामीनासाठी प्रयत्न करू शकणार आहेत.































































