गुजरातमध्ये समुद्रात बोट उलटली, 15 मच्छीमारांचा बुडून मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुजरातमधील पोरबंदर जवळ समुद्रात एक बोट उलटली. या दुर्घटनेत तब्बल 15 मच्छीमारांचा बुडून मृत्यू झाला आहे. तसेच दोन मच्छीमार बेपत्ता झाले आहेत.

द्वारका पोलिसांनी  दिलेल्या माहितीनुसार प्रशासनाने दोन दिवस मासेमारीवर बंदी घातली आहे. तरी 24 मच्छीमार असलेली एक बोट रुपेण बोटावरून मासेमारीसाठी निघाली होती. नंतर ही बोट समुद्रात उलटली त्यात 15 मच्छीमारांचा बुडून मृत्यू झाला. 14 मच्छीमार कसेतरी पोहत पोहत द्वारकेच्या विविध किनारी पोहोचले.

मृतांपैकी आठ मच्छीमारांचे मृतदेह द्वारकेच्या रुपेण बंदरावर सोमवारी रात्री सापडले आहेत.  कोस्ट गार्ड आणि राज्य पोलीस बेपत्ता मच्छीमारांचा शोध घेत आहेत.