
मुंबईकरांना दर्जेदार वाहतूक सेवा मिळावी यासाठी 400 किमींच्या रस्त्यांसाठी तब्बल सहा हजार कोटींची निविदा प्रक्रिया सुरू आहे. मात्र सिमेंट-काँक्रीटमुळे पाणी मुरत नसल्याने पूरमुक्तीचा धोका टाळण्यासाठी सिमेंट रस्त्यावर प्रत्येक 150 मीटरवर भूमिगत टाक्या बांधण्यात येणार आहेत. शिवाय सिमेंटचे रस्ते खोदल्यास खड्डे पडत असल्याने रस्त्यांच्या खाली ‘युटिलिटी डक्ट’ बांधण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी सांगितले.
मुंबईत आतापर्यंत 1050 किमी रस्ते सिमेंट-काँक्रीटने बनवण्यात आले आहेत. सिमेंट-काँक्रीट रस्त्यांकर पाकसामुळे खड्डे पडण्याचे प्रमाण अत्यल्प असून देखभालीचा खर्चदेखील कमी असल्याने काँक्रीटचे रस्ते बनकण्यात येत आहेत. सध्या 236.58 लांबीच्या रस्त्यांचे काम सुरू आहे. आता आणखी तब्बल 400 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काम हाती घेण्यात येणार आहे.
युटिलिटी डक्टचा असा होणार फायदा
z रस्त्यांखाली अनेक सुविधांचे जाळे आहे. सिमेंटचा रस्ता खोदल्यास पुन्हा अपेक्षित प्रमाणात दुरुस्ती शक्य होत नाही. z त्यामुळे आता फोन, केबल, विजेच्या वाहिन्या रस्त्याखालून टाकण्यासाठी रस्ते खोदावे लागणार नाहीत. दरम्यान, सिमेंटच्या रस्त्यासाठी किमान सहा मीटर अशी अट आतापर्यंत होती. z मात्र आता सहा मीटरपेक्षा कमी रुंदीचे रस्तेही सिमेंट- काँक्रीटचे बनवण्यात येणार आहेत. या सर्क रस्त्यांची प्रत्यक्ष कामे सुरू असताना कामाची सकिस्तर माहिती नागरिकांना बॅरिकेड्सकरील क्यूआर कोड स्कॅन करून पाहता येणार आहे. शिवाय दर्जा राखण्यासाठी ऑडिटरची देखरेख राहणार आहे.





























































