
विदर्भात गेल्या आठ दिवसात 16 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यातील सहा आत्महत्या अवघ्या दोन दिवसांत यवतमाळ जिह्यातील मारेगाव तालुक्यात झाल्याचे वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी म्हटले आहे.
2 सप्टेंबरला यवतमाळ जिल्ह्यात मारेगाव तालुक्यात म्हैसदोडका, नरसाळा, रामेश्वर, गदाजी बोरी येथे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना भेट दिली असता या घरापर्यंत प्रशासन, पोलीस, कृषी, ग्रामविकास, आरोग्य आदी एकाही विभागाचा अधिकारी पोहचला नव्हता. यावरून शेतकरी आत्महत्याविषयी अधिकारी किती उदासीन आहेत, हे दिसते, अशी खंत तिवारी यांनी व्यक्त केली आहे.


























































