मुंबईत कोरोनाचे 16 रुग्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत कोरोना नियंत्रणात असून आज दिवसभरात 16 रुग्ण सापडले. त्यापैकी 15 जणांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती. त्यातील केवळ एकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुंबईत गेले काही दिवस एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसून आज एकही गंभीर रुग्ण सापडला नाही. कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 98 टक्के इतके मोठे आहे. दरम्यान, सक्रिय रुग्णांची संख्या कमी होत असून सक्रिय रुग्णांची संख्या 51 वर पोहोचली आहे. दिवसभरात 2 हजार 932 कोरोना चाचण्या करण्यात आल्या तर आतापर्यंत एकूण चाचण्यांची संख्या 1 कोटी 85 लाख 73 हजार 573 चाचण्या करण्यात आल्या आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत मुंबईत 19 हजार 744 जणांचा मृत्यू झाला आहे.