ऑस्ट्रेलियाच्या जंगलात भीषण आग, 16 जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑस्ट्रेलियाच्या जंगलात भीषण आग लागली आहे. आगीमुळे मोठ्या प्रमाणात जिवीतहानी झाली आहे. या आगीमुळे आतापर्यंत तब्बल 16 जणांचा मृत्यू झाला आहे. 16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियातील हे जंगल धगधगत आहे.

आगीमुळे अनेक घरे भस्म झाली अहएत. तसेच बुधवारी तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. जे लोक आगीत होरपळले आहेत त्यांच्यावर उपचार सुरू अहए. अग्निशमन दलाच्या गाड्या दररोज आग शमवण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत. आगीमुळे तापमान 40 डीग्री वर पोहोचण्याची शक्यता आहे.

आगीमुळे 50 घरातील वीज बंद झाली आहे. 100 ठिकाणी अग्निशमन दलाच्या अडीच हजार गाड्या कार्यरत आहेत. आतापर्यंत या आगीत 200 हून अधिक घरे भस्मसात झाली आहेत.