
आता पुन्हा एकदा रुग्णवाढ होत आहे. मुंबईत आज दिवसभरात 172 कोरोनाबाधित आढळले आहेत. कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ होत असली तरी मृत्युदर रोखण्यात पालिकेला यश येत आहे.
शनिवारी दिवसभरात एकाही रुग्णाचा मृत्यू न झाल्याने मृतांची संख्या 19, 563 वर स्थिरावली आहे. तर दिवसभरात 94 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत 10 लाख 40 हजार 259 रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. त्यामुळे मुंबईत सध्या 784 सक्रिय रुग्ण आहेत.

































































