देशातील 18 कोटी ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घ्या, एम्सने जारी केली मार्गदर्शक तत्त्वे

1425

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशवासियांना संबोधित करताना घरांतील ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घेण्यास सांगितले आहे. अशातच केंद्रीय सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय आणि एम्सच्या वार्धक्यशास्र विभागाने देशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. या संकटाच्या काळात ज्येष्ठांनी सुरक्षित कसे राहावे, त्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी कशी घ्यावी, यासंबंधी मार्गदर्शन करण्यात आले आहे.

हे कोणासाठी
60 वर्षे व त्याहून अधिकच्या व्यक्ती. विशेषतः दमा, श्वसनात तीव्र अडथळा, दीर्घकालीन श्वसन रोग, फुफ्फुसाचे आजार, ब्रॉन्काइटेटिस, तीव्र हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग, मूत्रपिंडाचा आजार, हिपॅटायटिस, तीव्र यकृत रोग, पार्किन्सन, स्ट्रोकसारखी तीव्र न्यूरोलॉजिकल स्थिती.

कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेतली पाहिजे. जर कुणी ज्येष्ठ एकटे रहात असतील, तर ती आजूबाजूच्या युवकांनी जबाबदारी आहे. ज्येष्ठांच्या तब्बेतीकडे दुर्लक्ष करू नये.
– डॉ. विजय गुर्जर, वार्धक्यशास्र विभाग, एम्स, नवी दिल्ली

काय कराल
-पूर्ण वेळ घरात राहून अभ्यागतांना भेटणे टाळा, कोणालाही भेटताना एक मीटर अंतर पाळा.
-घरात योग किंवा व्यायाम करा
-जेवण्याआधी किंवा वॉशरुमचा वापर केल्यानंतर हात जरुर धुवावेत
-कमीत कमी 20 सेकंद हातांना साबण लावा.
-नाक- तोंड झाकून घ्या.

काय करू नका
– ज्या व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत असतील, त्यांच्याशी संपर्क टाळा.
-गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका.
-सर्दी- खोकला असणाऱया व्यक्तींपासून अंतर ठेवा.
-डोळे, नाक आणि चेहऱयाला स्पर्श करू नका.
– चेकअपसाठी रुग्णालयात जाऊ नका.

ज्येष्ठांची संख्या किती

मार्गदर्शत तत्वातील पत्रानुसार, 2011 च्या जनगणनेनुसार, देशात अंदाजे 16 कोटींपेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्यांचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त आहे. 60 ते 69 वयोगटांत 8 कोटी 80 लाख ज्येष्ठ आहेत. 70 ते 79 या वयोगटात 6 कोटी 40 लाख, तर ज्यांचे वय 80 वर्षांपेक्षा अधिक आहे, अशा नागरिकांची संख्या 2 कोटी 80 लाख आहे. देशात निराधार किंवा कुटुंब सांभाळत नसलेल्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या 18 लाख आहे. असे देशात एकूण 18 कोटी 18 लाख ज्येष्ठ आहेत. या काळात त्यांचा धोका कमी करण्यात ही ऍडवायजरी उपयोगी पडणार असल्याचे पत्रात म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या