वर्षभरात 18 लाख अमेरिकन पर्यटक हिंदुस्थानात

हिंदुस्थानात फिरायला येणाऱया पर्यटकांमध्ये अमेरिकेचे नागरिक सर्वात जास्त आहेत. 2024 या वर्षात 18 लाख 4 हजार 586 अमेरिकन नागरिकांनी हिंदुस्थानचा दौरा केला आहे. दुसऱया नंबरवर बांगलादेशचे नागरिक असून 17 लाख 50 हजार 165 पर्यटक हिंदुस्थानात आले. तिसऱया नंबरवर यूकेचे पर्यटक असून ही संख्या 10 लाख 28 हजार 557 इतकी आहे. 2024 मध्ये एकूण 99.52 लाख विदेशी पर्यटक हिंदुस्थानात आल्याची माहिती केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी राज्यसभेत दिली आहे. कोरोना महामारीनंतर हिंदुस्थानात येणाऱया पर्यटकांची संख्या गेल्या पाच वर्षांत चार पटीने वाढली आहे. विदेशातून येणारे पर्यटक हे केवळ हिंदुस्थानातील धार्मिक स्थळांपर्यंत मर्यादित राहिले नाहीत, ते ग्रामीण भागातही जात आहेत, असे शेखावत यांनी सांगितले.