
मुंबईत बसखाली चिरडून एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. बोरीवलीतील ही घटना असून सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली आहे.
मुंबईत बोरीवलीत बसखाली चिरडून एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. अमन यादव असे मृत व्यक्तीचे नाव असून कार चालकाच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाला आहे. पोलिसांनी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. pic.twitter.com/KOU3MhkkJF
— Saamana (@SaamanaOnline) April 11, 2021
मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी बोरीवलीतील दौलत नगर भागात एस.व्ही रोडवर 19 वर्षीय विद्यार्थी अमन यादव हा आपल्या स्कूटरवरून जात होता. तेव्हा रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका कारचालकाने गाडीचा दरवाजा उघडला. त्यामुळे अमन थोडा गोंधळला. त्याचा बाईकवरून ताबा सुटला आणि तो बसखाली आला. त्याला तातडीने शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





























































