आफ्रिकेतून आणलेल्या दोन चित्त्यांनी केली पहिली शिकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
cheeta

आफ्रिकेहून आणलेल्या चित्त्यांपैकी दोघांचा विलगिकरणाचा काळ संपल्यानंतर त्यांना कुनो नॅशनल पार्कच्या मध्ये मोठ्या जागेत सोडण्यात आलं आहे. हे दोघे आता इथल्या वातावरणाशी जुळले असून 24 तासाच्या आत त्यांनी त्यांची पहिली शिकार केली आहे. मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्क (KNP) मध्ये सप्टेंबरच्या मध्यात नामिबियातून आणलेल्या आठ चित्तांपैकी दोन चित्त्यांना शनिवारी एका मोठ्या जागेत हलवण्यात आले होते.

कुनो नॅशनल पार्कमधील एका मोठ्या आवारात सोडल्याच्या 24 तासांच्या आत या दोन चित्त्यांनी पहिली शिकार केली.

यात्पूर्वी, अधिकाऱ्याने सांगितले की या महिन्याच्या अखेरीस आठही चित्ते (पाच मादी आणि तीन नर) मोठ्या जागेत सोडले जातील.

हिंदुस्थानात चित्ते पाहता यावेत आणि जैवसाखळी टिकवण्याच्या योजनेचा एक भाग म्हणून 17 सप्टेंबर रोजी नामिबियातून हे चित्ते आणण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चित्त्यांना आवारात सोडले होते. 5 नोव्हेंबर रोजी ते येथे 50 दिवस पूर्ण करतील. सुरुवातीच्या योजनेनुसार, फ्रेडी, अल्टोन, सवाना, साशा, ओबान, आशा, चिबिली आणि सायसा नावाच्या या चित्त्यांना महिनाभर वेगळे ठेवण्यात आले होते. तज्ज्ञांच्या मते, सहसा वन्य प्राणी ते त्यांच्या हस्तांतरणापूर्वी आणि नंतर एक महिना त्यांना विलगणीकरणात मध्ये ठेवले जाते, जेणेकरून ते दुसर्‍या देशातून त्यांच्यासोबत आणलेले कोणतेही संक्रमण पसरू नये.