पुण्यात दोन वेगवेगळ्या अपघातात दोघे ठार, एक जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुण्यात दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून एकजण गंभीररित्या जखमी झाला आहे. हे अपघात नगर-पुणे रस्त्यासह कवटीपाट टोलनाक्यावर झाले आहेत. याप्रकरणी विमानतळ आणि लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भरधाव पाणी टँकर चालकाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरूण ठार झाला. अपघातात एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात 21 नोव्हेंबरला सव्वा चारच्या सुमारास पुणे-नगर रस्त्यावर घडला. युसूफ दाउद शेख वय 42 रा. ताडीवाला रस्ता असे ठार झालेल्याचे नाव आहे. उल्हास पाटील असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी जुबेदा शेख वय 62 यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. उल्हास पाटील असे जखमीचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक एस. एस. कोल्लुरे तपास करीत आहेत.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत रस्त्यानजीक पार्क केलेल्या पिकअप वाहनाला धडकून एकजण ठार झाला. हा अपघात 22 नोव्हेंबरला रात्री साडेअकराच्या सुमारास कवडीपाट टोलनाक्याजवळ कदमवाक वस्ती परिसरात घडला. हरिदास मधुकर गरड वय 37 रा. गणेशवाडी, थेउर असे ठार झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी नितीन गरड वय 35 यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. हरिदास दुचाकीवरून कवडीपाट टोलनाका परिसरातून जात होता. त्यावेळी परिसरात रस्त्यानजीक पीकअप वाहन उभे करण्यात आले होते. संबंधित वाहनाला जाउन धडकल्यामुळे हरिदास गंभीररित्या जखमी होउन ठार झाला. पोलीस उपनिरीक्षक तरटे तपास करीत आहेत.