
सामना ऑनलाईन, राहुरी
राहुरी कॉलेजजवळ झालेल्या एका रस्ते अपघातात 2 तरुणांचा मृत्यू झाला आहे. योगेश आबासाहेब गवांदे (वय-28 वर्ष, राहणार कराळेवाडी राहुरी फॅक्टरी) व पांडुरंग भागवत तुपे (वय-27, राहणार अंबिकानगर राहुरी फॅक्टरी) अशी मृतांची नावे आहेत. हॉटेल जगदंबाजवळ गुरूवारी मध्यरात्री ही दुर्घटना घडली. योगेश आणि पांडुरंग हे बाईकवरून जात होते, यावेळी पाठून आलेल्या वाहनाने या दोघांना उडवलं. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. गुरूवारी दुपारी राहुरी येथे शव विच्छेदन केंद्रावर जमलेल्या नातेवाईकांनी दोघा तरूणांचे मृतदेह पाहून हंबरडा फोडला. यावेळी इथलं वातावरण काहीकाळ तणावपूर्ण झालं होतं.


























































