अजित पवारांच्या दालनासाठी दोन अधिकारी विस्थापित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहाव्या मजल्यावरील दालनासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील दोन अधिकाऱयांना विस्थापित करण्यात आले आहे. त्याशिवाय उपमुख्यमंत्री कार्यालयातील कर्मचाऱयांनाही विस्थापित केले आहे.

मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दालन आहे. याच मजल्यावर फडणवीसांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह व श्रीकर परदेशी यांना दोन दालने पूर्वी वितरित करण्यात आली होती. हे दोन्ही अधिकारी फडणवीसांच्या अत्यंत मर्जीतील आहेत. म्हणून आपल्याच मजल्यावर दोन दालने दिली होती. पण या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी या दोन्ही अधिकाऱयांना बाहेर काढण्यात आले आहे. या दोन अधिकाऱयांना अन्य दालने वितरित करण्यात येतील. त्याशिवाय सातव्या मजल्यावरील चार दालने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात येणार आहेत. या दालनात देवेंद्र फडणवीस यांचे अधिकारी व कर्मचारी सध्या आहेत. या अधिकाऱयांनाही अन्यत्र स्थलांतरित करण्यात येणार आहे.