21 डिसेंबर..  आज दिवस सगळ्यात लहान..

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

>> आसावरी जोशी 

अंतराळाची भव्यता.. ग्रहांची गूढता आपल्याला नेहमीच खुणावत राहते.. या ग्रह गोलांचे चलन वलन आपल्यावरही परिणाम करणारे.. यातूनच त्यांच्या जवळ जाण्याचे निमित्त आपण नेहमीच शोधत राहतो. आज 21 डिसेंबर.. वर्षातील सगळ्यात लहान दिवस. आज दिवस फक्त 10 तासांचा असेल.. काय असतील यामागची कारणे..

वर्षातील प्रत्येक दिवस तसा वेगळा असतो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपण इतके हौशी असतो की पृथ्वीशी, अंतराळाशी  स्वत:ला जोडून घ्यायला आपल्याला खूप आवडते. यातूनच आपण दिन विशेष शोधत असतो.. मग तो कधी शून्य सावली दिन असतो, कधी अंतराळ दिन, तर कधी कोणता दिन.. दिन कोणताही असो पण आपल्याला नेहमीच अंतराळाची भव्यता.. ग्रह गोलांची गूढता खुणावत राहिली आहे.. व यातूनच आपण त्यांचे नाते आपल्याशी जोडून त्यांचा शोध घेत राहतो.. मात्र खगोलशास्त्राच्या दृष्टीने वर्षातील चार दिवस हे महत्त्वाचे आणि खास असतात. 21 डिसेंबर हा वर्षातील सर्वात छोटा दिवस असतो. याला विंटर सोलस्टाइस नावानेही ओळखले जाते. याशिवाय 21 मार्च आणि 23 सप्टेंबर या दोन्ही दिवशी दिवस आणि रात्रीची वेळ समसमान असते. 21 जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. या दिवशी वर्षातील सर्वाधिक वेळ सूर्यदर्शन होते.

 21 डिसेबरचा दिवस सर्वात छोटा का?

–  पृथ्वीच्या आपल्या अंतरावरील आवर्तनादरम्यान वर्षातील एक दिवस असा येतो जेव्हा दक्षिण गोलार्धात सूर्याचे धरतीपासूनचे अंतर सर्वात जास्त असते. परिणामी 21 डिसेंबर हा दिवस वर्षाचा सर्वात लहान दिवस असतो आणि रात्र सर्वात मोठी असते. या दिवसाला विंटर सोलस्टाईस असे म्हटले जाते.

21 डिसेंबरला सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणात प्रवेश करतो. या दिवशी सूर्यकिरण हे मकर रेषेत लंबवत होत कर्क रेषेला  तिरपे होत स्पर्श करतात. यामुळे लवकर सूर्यास्त होतो आणि रात्र लवकर होते. पूर्व दिशेला उगवणारा सूर्य आपल्या पृथ्वीच्या आसाच्या तिरपेपणामुळे दररोज उदयस्थान बदलत असतो; परंतु हा फरक काही दिवसांनंतर लक्षात येतो. कधी पृथ्वीचा उत्तर तर कधी दक्षिण गोलार्ध सूर्यासमोर येतो. यामुळे दिनमानात फरक पडून पृथ्वीवरील विविध वृत्तावरील अक्षवृत्तावर हा फरक कमी जास्त असतो. आपल्या भागात २१  डिसेंबर हा दिवस सर्वात लहान असून, या दिवशी रात्र सव्वातेरा तासांची असणार आहे. या दिवशी सूर्य नेमका मकरवृत्तावर उगवणार आहे.

पृथ्वीचा अक्ष भ्रमणकक्षेशी कललेला असल्याने सूर्याचे भासमान चलन सतत सुरु असते. 21 मार्च व 23 सप्टेंबर या विषूवदिनी सूर्य नेमका पूर्वेस असतो. म्हणूनच या दिवशी दिवस व रात्र समान असतात. 21 जून हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस, तर 21 डिसेंबर हा सर्वात लहान दिवस असतो. या उलट स्थिती दक्षिण गोलार्धात पहावयास मिळते. सध्या आपल्याकडे हिवाळा सुरु असून, आकाश निरभ्रच असते., 21 डिसेंबरची रात्र मोठी असल्याने रात्रीचे वेळी ग्रह, तारे बघण्याचा आनंद घेता येईल. सूर्यमालेतील पृथ्वीवरून मंगळ, बूध, गुरु, शुक्र व शनी हे पाच ग्रह नुसत्या डोळ्यांनी पाहता येतात.

21 डिसेंबर आज केवळ 10 तास 47 मिनिटे सुर्याचे दर्शन घडणार आहे. व उर्वरित तासांची रात्र असणार आहे. 21 डिसेंबर रोजी सुर्य सगळ्यात जास्त दक्षिणेकडे असतो. या बिंदूला ‘विंटर सोल्सस्टाईल’ असे म्हणतात. या बिंदूवर सुर्य असताना हा दिवस वर्षातील सर्वात लहान दिवस आणि सर्वात मोठी रात्र ठरते. दिवस व रात्रीचा कालावधी हा कमी अधिक होत असल्याचा अनुभव नेहमीच येतो. पृथ्वीचा अक्ष 23.5 अंशाने कललेला असल्याने हे घडते. याचाच परिणाम म्हणून सूर्याचे उत्तरायण व दक्षिणायणचा अनुभवसुद्धा येतो. कोणत्याही वस्तुच्या सावलीचे निरीक्षण केल्यास सूर्याचे दक्षिणायण व उत्तरायण सहज लक्षात येऊ शकतो. पृथ्वीवरील ऋतुसुद्धा अक्षाच्या कलतीच्या स्थितीमुळे निर्माण होतात. आकाशात वैष्विक आणि आयनिक वृत्ताचे दोन काल्पनीक छेंदन बिंदू आहे.

सोलस्टाईस शब्द सोल्सटाइन या लॅटीन शब्दापासून तयार झाला आहे. त्याचा अर्थ ‘सूर्य स्थिर आहे’ असा होतोय.

21 डिसेंबर सूर्य सगळ्यात जास्त दक्षिणेकडे असतो. या बिंदूवर सुर्य असताना हा दिवस वर्षातील सर्वात लहान दिवस आणि सर्वात मोठी रात्र ठरते. या दिवशी रोजी सूर्य किरण हे मकर रेषेत लंबवत होत कर्क रेषेला तिरपे होत स्पर्श करतात. यामुळे लवकर सूर्यास्त होतो आणि रात्र लवकर होते. पृथ्वी आपल्या कक्षेतून एक लाख पाच हजार किमी तासाच्या वेगाने सुमारे 89 कोटी 40 लाख किमी लंब वर्तुळाकार कक्षेत सूर्याची परिक्रमा करते. या दिवशी सूर्य सगळ्यात जास्त दक्षिणेकडे असतो. या बिंदूवर सुर्य असताना हा दिवस वर्षातील सर्वात लहान दिवस आणि सर्वात मोठी रात्र ठरते. पृथ्वीचा अक्ष 23.5 अंशाने कललेला असल्याने हे घडते.

आज 21 डिसेंबर हा वर्षातील सर्वात लहान दिवस आहे. दरवर्षी हा दिवस बदलत राहतो. गेल्या वर्षी हा दिवस 22 डिसेंबरला होता. या वर्षातील सर्वात लहान दिवसाला हिवाळी संक्रांती (Winter solstice) म्हणतात. जाणून घ्या, यामागचे शास्त्र काय आहे आणि या दिवसाच्या आधी आणि नंतर काय बदल होतात.

सर्वप्रथम संक्रांती म्हणजे काय ते समजून घेऊ. हा लॅटिन शब्द आहे, ज्याचा अर्थ सूर्यास्त असा होतो. पृथ्वी आपल्या अक्षावर फिरते आणि सूर्याकडे दिशा बदलते. अशा परिस्थितीत पृथ्वीचा जो भाग सूर्याच्या संपर्कात येतो तो संक्रांती या शब्दाशी संबंधित आहे.

उत्तर गोलार्धातील सर्वात लहान दिवस

आजचा दिवस उत्तर गोलार्धातील सर्वात लहान दिवस आहे. याचा अर्थ या दिवशी सूर्य पृथ्वीच्या या भागात सर्वात कमी काळ राहील. दुसरीकडे, दक्षिण गोलार्धात आज सूर्य सर्वात जास्त काळ राहील आणि अशा प्रकारे या भागात येणाऱ्या देशांना या दिवशी सर्वात मोठा दिवस दिसेल. उदाहरणार्थ अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेत आजपासून उन्हाळा सुरू होत आहे. जगाच्या एका भागात सर्वात मोठा दिवस तर दुसरीकडे सर्वात लहान दिवस. यावरून असं लक्षात येतं, की आजचा दिवस जगातील दोन भागांमध्ये विभिन्न असणार आहे. म्हणजे एकीकडे सर्वात लहान तर दुसरीकडे सर्वात मोठा. दिवस लहान किंवा मोठा असण्याचे कारण म्हणजे पृथ्वीची स्थिती. इतर सर्व ग्रहांप्रमाणे आपला ग्रह त्याच्या अक्षावर सुमारे 23.5 अंश झुकलेला आहे. परिणामी आपल्या अक्षावर फिरत असल्याने सूर्याची किरणे एका ठिकाणी जास्त आणि इतर ठिकाणी कमी पडतात. जेथे सूर्यप्रकाश थोड्या काळासाठी येतो तिथे दिवस लहान असतो, तर जास्त प्रकाशाने दिवस मोठा होतो.

पृथ्वीचं झुकण्याचं कारण काय?

पृथ्वी आपल्या अक्षावर एका विशिष्ट कोनात का झुकलेली असते, हा प्रश्न अनेकदा पडतो. सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की जेव्हा सूर्यमाला आकार घेत होती, त्या दरम्यान पृथ्वीची एका ग्रहाशी जोरदार टक्कर झाली आणि त्यानंतरच पृथ्वी आपल्या अक्षावर तिरकी झाली असावी.

सूर्यापासूनचे अंतर 6 महिने वाढते

आता उत्तर गोलार्धाबद्दल बोलूया, म्हणजे वर्षाचे 6 महिने हा भाग सूर्याकडे झुकलेला असतो. त्यामुळे या संपूर्ण काळात येथे भरपूर सूर्यप्रकाश येतो. त्यामुळे या महिन्यांत उष्णता कायम राहते. त्याचवेळी उर्वरित 6 महिन्यांत हा भाग सूर्यापासून दूर जातो, तेव्हापासून दिवसाचा कालावधी कमी होऊ लागतो.

सूर्य उत्तरायणातून दक्षिणायनाकडे जर आपल्या भाषेत समजायचे झाले तर या दिवशी सूर्य मकर राशीतून उत्तरायणाकडून दक्षिणायनात प्रवेश करतो. या दिवसापासून थंडी वाढू लागते. म्हणजे, उत्तर भारतात अजून कडाक्याची थंडी वाढणार आहे. या दिवसापासून थंडी पडेल आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता असते.

या दिवशी सणही साजरे केले जातात

प्राचीन काळी लोक या दिवसाच्या आधारे अनेक गोष्टी ठरवत असत आणि सणही याच पद्धतीने साजरे केले जात असत. आध्यात्मिकदृष्ट्या हा दिवस नवीन गोष्टींचे स्वागत करण्याचा दिवस आहे. वेल्सच्या भाषेत या दिवसाला “अल्बन अर्थन” (Alban Arthan) म्हणजेच हिवाळ्याचा प्रकाश म्हणतात. हा दिवस ब्रिटनच्या या भागात मोठा सण म्हणून साजरा केला जातो. असे मानले जाते की हे दिवस आणि त्याच्याशी संबंधित सण मानवी इतिहासातील सर्वात जुने सण आहेत.

रोममध्येही हा दिवस साजरा करण्याची संस्कृती आहे. त्याला सॅटर्नलिया (Saturnalia) म्हणतात. म्हणजेच रोममध्ये पिकांची देवता मानल्या जाणाऱ्या शनीचा दिवस. त्याचा उत्सव 17 डिसेंबरपासून सुरू होतो आणि पुढील सात दिवस चालतो.

…म्हणून आज असतो सर्वात लहान दिवस

गुगलने याबाबत डुडलही बनवलं आहे. पृथ्वीच्या आपल्या अंतरावरील आवर्तना दरम्यान वर्षातील एक दिवस असा येतो जेव्हा दक्षिण गोलार्धात सूर्याचे पृथ्वीपासूनचे अंतर सर्वात जास्त असते. परिणामी 21 डिसेंबर हा दिवस वर्षाचा सर्वात लहान दिवस असतो आणि रात्र सर्वात मोठी असते. भारतात पावसाळ्यानंतर येणाऱ्या हिवाळ्यात रात्र मोठी असते आणि दिवस लहान होत. 21 डिसेंबर या दिवशी रात्र सर्वात मोठी आणि दिवस सर्वात लहान अशी स्थिती असते.

आजच्या दिवशी सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणात प्रवेश करतो. पृथ्वी आपल्या कक्षेतून एक लाख पाच हजार किमी तासाच्या वेगाने सुमारे 89 कोटी 40 लाख किमी लंब वर्तुळाकार कक्षेत सूर्याची परिक्रमा करते.

21 डिसेंबर रोजी सूर्य सगळ्यात जास्त दक्षिणेकडे असतो. या बिंदूवर सुर्य असताना हा दिवस वर्षातील सर्वात लहान दिवस आणि सर्वात मोठी रात्र ठरते. दिवस व रात्रीचा कालावधी हा कमी अधिक होत असल्याचा अनुभव नेहमीच येतो. पृथ्वीचा अक्ष 23.5 अंशाने कललेला असल्याने हे घडते. याचाच परिणाम म्हणून सूर्याचे उत्तरायण व दक्षिणायणचा अनुभवसुद्धा येतो. कोणत्याही वस्तुच्या सावलीचे निरीक्षण केल्यास सूर्याचे दक्षिणायण व उत्तरायण सहज लक्षात येऊ शकतो. पृथ्वीवरील ऋतुसुद्धा अक्षाच्या कलतीच्या स्थितीमुळे निर्माण होतात. आकाशात वैष्विक आणि आयनिक वृत्ताचे दोन काल्पनीक छेंदन बिंदू आहे. यापैकी एका बिंदूत 22 मार्च रोजी सूर्य प्रवेश करतो, याला शरद संपात बिंदू असे म्हणतात, या दोन्ही दिवशी रात्रीचा व दिवसाचा कालावधी हा सारखाच असतो.

विंटर सोलस्टाइस जगभरात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. चीनमध्ये आजचा दिवस पॉझिटीव्ह अॅनर्जीचा दिवस समजला जातो. चीन बरोबरच तैवानमध्ये या दिवशी लोक पारंपरिक अन्नाला प्राधान्य देतात. पाकिस्तानमधील उत्तर पश्चिम भागातील आदिवासी जमाती या दिवशी उत्सव साजरा करतात. जर्मनी, फ्रान्स आणि इंग्लंड या देशातील काही भागात आजच्या दिवशी द फिस्ट ऑप जूल फेस्टिव्हल साजरा केला जातो.

 संपूर्ण जगात असा साजरा होतो दिवस

– चीनमध्ये 21 डिसेंबर हा दिवस पॉझिटीव्ह अॅनर्जीचा दिवस समजला जातो. चीन बरोबरच तैवानमध्ये या दिवशी लोक पारंपरिक अन्नाला प्राधान्य देतात.

– पाकिस्तानमधील आदिवासी जमाती या दिवशी उत्सव साजरा करतात.

ब्रूमालियाच्या नावाने होते खास आयोजन

– हा रोमचे नागरिक हा खास उत्सव साजरा करतात. याला संपन्नता, शेती आणि आपल्या पूर्वजांचा सन्मान या अर्थाने पाहिले जाते.