खेड्याकडे चला, जम्मू कश्मीरच्या चित्ररथाने दिला संदेश

496

71 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज राजपथावर विविध राज्यांचे चित्ररथांचे संचालन झाले. त्यात गोव्याच्या चित्ररथाने बेडूक वाचवा तर जम्मू कश्मीरच्या चित्ररथाने खेड्याकडे चला असा संदेश दिला. तसेच गुरू नानक यांच्या 550 व्या वाढदिवसानिमित्त पंजाबचा चित्ररथ सजला होता.

जम्मू कश्मीरला केंद्र शासित प्रदेशाचा दर्जा मिळाल्यानंतर त्यांचा हा पहिला चित्ररथ होता. त्यात कश्मीरी पंडित तसेच गावाकडे चला असा संदेश चित्ररथाच्या माध्यमातून दिला. या संचालनालयात 22 चित्ररथ सामील झाले होते. त्यापैकी 16 हे चित्ररथ हे विविध राज्य व केंद्र शासित प्रदेशांचे होते. तसेच उर्वरित सहा चित्ररथ हे विविध मंत्रालय, विभागांचे होते.

2019 मध्ये युनेस्कोने जयपूर शहराला जागतिक वारसाचा दर्जा दिला होता तसेच जयपूरला भिंतीचे शहर म्हणून गौरवले होते. राजस्थानचा चित्ररथ याच संकल्पनेवर आधारित होते. या चित्ररथात छत्तीसगड, तमिळनाडू, तेलंगाणा, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, गोवा, आंध्र प्रदेश, ओडिशा, कर्नाटक आणी उत्तर प्रदेशच्या चित्ररथांचाही समावेश होता.

आपली प्रतिक्रिया द्या