हिंदुस्थानी वंशाच्या महिलेला 24 कोटी नुकसानभरपाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लंडनच्या रॉयल मेल या टपाल सेवा कार्यालयातील वरिष्ठांनी मानसिक छळ केल्याचा आरोप ग्राह्य मानत हिंदुस्थानी वंशाच्या एका कर्मचारी महिलेला 24 कोटींहून अधिक नुकसानभरपाई देण्याचे आदेश येथील कर्मचारी लवादाने दिले आहेत.

टपाल खात्याने काम झुती या महिलेशी फारच अहंमन्य, अपमानस्पद आणि विखारी वर्तन केल्याचे लवादाने म्हटले आहे. कामाशी संबंधित विशेष बोनस मिळवण्यासाठी एक सहकारी गैरमार्गांचा अवलंब करत असल्याचे तिने  निदर्शनास आणून दिल्यावर वरिष्ठांनी तिच्यावर दडपण आणले आणि छळ केला, असे तिने लवादाला सांगितले होते.