
12 नोव्हेंबर – राज्याच्या उपराजधानीत थंडी वाढली असतानाच 24 तासात फक्त 8 रुग्णांचा मृत्यू झाला असून 283 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. तर 234 रुग्ण बाधित आढळले आहेत. आज नागपुरात फक्त 2 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्युसंख्या 3489 वर पोहोचली आहे.
283 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून आतापर्यंत 99172 रुग्ण कोरोना मुक्त आहेत. बरे होण्याचे प्रमाण 93.64 टक्के झाले आहे. बाधित रुग्ण 234 असून आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या 105888 वर पोहोचली आहे. 24 तासात 8 मृत्यू झाले असून त्यात 2 रुग्ण शहरातील 2 ग्रामीण भागातील व 4 जिल्ह्याबाहेरील रुग्ण आहे. आज 5022 चाचण्या झाल्या असून 3238 रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत.


































































