चंद्रपुरात आढळले कोरोनाचे 262 रुग्ण, 5 रुग्णांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रपूर जिल्ह्यात 24 तासात कोरोनाचे 262 रुग्ण आढळले असून एकूण बाधितांची संख्या 3 हजार 903 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 1 हजार 850 बाधित बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यात 2007 बाधितांवर उपचार सुरू आहे.

गेल्या 24 तासात 5 बाधितांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या 46 झाली असून चंद्रपूर 42, तेलंगाना एक, बुलडाणा एक आणि गडचिरोली 2 बाधितांचा समावेश आहे.

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परिसरातीस 143, सावली तालुक्यातील एक, बल्लारपूर तालुक्यातील 10, गोंडपिपरी तालुक्यातील एक, ब्रह्मपुरी तालुक्यातील 17, मूल तालुक्यातील 28, राजुरा तालुक्यातील 4, वरोरा तालुक्यातील 7, कोरपना तालुक्यातील 2, भद्रावती तालुक्यातील 17, पोंभूर्णा तालुक्यातील 9, नागभीड तालुक्यातील 9, सिंदेवाही तालुक्यातील 3, चिमूर तालुक्यातील 7, जिवती तालुक्यातील एक तसेच इतर जिल्ह्यातून यवतमाळ जिल्ह्यातील वणी  येथील एक, ठाणे मुंबई  येथील एक तर चामोर्शी तालुक्यातून एक असे एकूण 262 बाधित पुढे आले आहे.