
देशभरात कोरानाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली असतानाही राज्याच्या काwशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने नोव्हेंबर महिन्यात 26 हजार 93 लोकांना रोजगार मिळवून दिल्याची माहिती या विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी आज दिली. या वर्षात जानेवारी ते नोव्हेंबरअखेरपर्यंत 1 लाख 73 हजार 974 बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आल्याचे नवाब मलिक म्हणाले.


























































