रत्नागिरीतून 28 टन हापूसची निर्यात

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

रत्नागिरीतून हापूस आंबा मोठ्या प्रमाणात परदेशवारी करत आहे. रत्नागिरीतून 28 टन हापूस आंबा निर्यात झाला आहे. त्यामध्ये युरोप, अमेरिका, कॅनडा आणि दुबईचा समावेश आहे.

रत्नागिरी हापूस निर्यात सुविधा केंद्रात प्रक्रिया करून चांगल्या प्रतीचा आंबा परदेशात पाठवला जातो. परदेशात पाठविण्यात येणाऱ्या आंब्यातून शेतकरी डॉलर, दिनार अशा परकीय चलनात अर्थाजन करतो. अमेरिका किंवा युरोप मध्ये आंबा पाठविण्यापुर्वी अनेक चाचण्या पार कराव्या लागतात. रत्नागिरी हापूस निर्यात सुविधा केंद्रात यासर्व चाचण्या होतात. यंदा युरोपमध्ये रत्नागिरीतून 3.5 टन, अमेरिकेत 2 टन, 500 किलो, दुबईत 15 टन आणि कॅनडात 8 टन आंबा निर्यात झाला. 20 जून पर्यंत ही निर्यातची प्रक्रिया सुरु रहाणार आहे.

रत्नागिरीतून हापूस निर्यातीचा आकडा यंदा वाढला आहे. पणन मंडळाच्या निर्यात केंद्रात आंबा पिकविण्याची प्रक्रिया चालते. आतापर्यंत 105 टन आंबा पिकवून देण्यात आला आहे. त्याकरीता एका पेटीमागे 50 रुपयांचे शुल्क आकारले जाते.